Monday, April 13, 2020

कृष्णाई मंदिर

शाक्तांच महत्वाच पीठ " कृष्णाई मंदिर " ?


प्राचीन काळापासून काही म्हणी रूढ आहेत...  त्याला खूप मोठा लॉजिकल अर्थ आहे...  त्यातील एक म्हण आहे नदीचे मूळ आणि ऋषींचें कूळ विचारू नये. असं का असेल याचा विचार कधी तुम्ही केलाय का? ....  नसेल तर ऐका...  !!
कृष्णा नदीचं मूळ जुन्या महाबळेश्वर मध्ये एका झऱ्यातून होते...  पुढे ही नदी किती मोठी, आणि हिच्या काठावर किती संस्कृती वाढल्या, नांदल्या...  आणि या नदीन  पावसाळ्यात रुद्र रूप धारण केल्यास किती हाहाकार माजवू शकतो हे आपण या वर्षीचं पाहिलं आहे...  असाच  प्रकार गोदावरी त्र्यंबकेश्वरच्या सह्याद्री डोंगर रांगातून एका झऱ्यातून सुरुवात होते...  भीमा नदी.. भीमाशंकरच्या जंगलात अशाच झऱ्यातून सुरु होते. पुढे पंढरपूर आणि त्याच्या पुढे चंद्रभागा म्हणून वाहणारी ही नदी...  एका झऱ्यातून सुरु होणाऱ्या नद्या मूळ पाहून आरे ही नदीची सुरुवात  आहे तर... !!  म्हणून धक्का अर्थात आश्चर्याचा बसू शकतो... तसंच काहीसं ऋषींचें आहे...  भारतीय उपखंड सप्त सिंधू ( नद्या ) आणि सप्त ऋषींच्या उगमातून निर्माण झाला आहे. आपलें गोत्र बघताना या सप्त ऋषीं पैकी एकाचे असते म्हणजे ते आपलें कूळ आहे...  म्हणून जास्त खोलात जाऊ नये त्यात अनेक गुंतागुंती लक्षात येतात त्यातून माणूसपणच ठळक होते...  बाकी सगळं माणसांनी उभं केलंय हे लक्षात घ्या. तुम्हाला जे सांगायचं आहे त्याची पार्श्वभूमी म्हणून हे सांगितले.
हजारो वर्षापासून शैव संप्रदायातला शक्तीला भजणारा एक महत्वपूर्ण हिस्सा म्हणजे शाक्त संप्रदाय.... आणि या संप्रदायाच महत्वाच पीठ महाबळेश्वर येथील कृष्णाई मंदिर असण्याची शक्यता आहे ... गुप्त काळापासून हा संप्रदाय थोडा संशयाच्या भव- यात आला आणि लोकांची सक्रियता कमी होत गेली. शाक्तातल शक्तीपीठ लोकांनी स्विकारल मात्र मंत्र आणि तंत्र यापासून लोकांनी दोरी ठेवली ... त्यातून अनेक गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे शाक्त संप्रदायाला गुढ आणि चमत्कारात ढकलण्यास त्याकाळातली राजसत्ता आणि धर्मसत्ता यशस्वी ठरल्या. त्यातूनच सर्वांग सुंदर असलेल्या कृष्णाई मंदिर शेकडो वर्षे दुर्लक्षित राहीले नव्हे गावकऱ्यांच्या सांगण्यावरुन ४० एक वर्षापूर्वी पर्यंत या मंदिराकडे कोणी फिरकतही नव्हते ... इथे स्मशान म्हणूनही वापर होत होता असे काही जणांचे म्हणने आहे. मुळात या मंदिरातील दगडावर जे शिल्प आहेत ते अभ्यासण्यासारखे आहेत. बघितल्यानंतर ते कोड्या सारखे वाटतात. एकात एक कडे असलेले शिल्प कोड लैग्वेंजचा फॉर्म असण्याची शक्यता  नाकारता येत नाही. आता हे मंदिर पुरातत्व विभागाकडे  असून पर्यटकांसाठी खुले आहे. हे मंदिर अभ्यासणा-यांसाठी एक आव्हान आहे हे मात्र खरे ... !!

@युवराज पाटील